महेश एलकुंचवारांची नाटकं आमच्यासमोर हाडामांसाची जिवंत रसरशीत पात्रं उभी करतात, आम्हाला श्रीमंत करतात
एलकुंचवारांच्या कलाविचारात साधनेला, तपस्येला अतिशय महत्त्व आहे. शोध घेणं ही सर्वांत महत्त्वाची निकड आहे. प्रायोगिक असणं हा नैसर्गिक निर्णय आहे. लौकिक यशापयश अतिशय कमी महत्त्वाचं आहे. कुठल्याही दिखाऊपणाला, अनावश्यक झगमगाटाला त्याच्यात स्थान नाही. कलाकारांनी कायम आपल्या अंत:प्रेरणा तपासून पाहत स्वत:ला आणि स्वत:तील कलेला, कलाकाराला घडवत राहावं, असा अतिशय मूलभूत विचार ते कायम जगलेले आहेत व मांडतही आलेले आहेत.......